Posts

Showing posts from September, 2024

बिग बॉस’मध्ये यंदाची पहिली Wild Card एन्ट्री! कोण आहे तो? वाचा…

Image
  ‘बिग बॉस मराठी’ सीझन ५ च्या पर्वात स्पर्धक मंडळी धुमाकूळ घालताना दिसत आहेत. यंदाच्या या नव्या पर्वात रील स्टार, अभिनेते, अभिनेत्री, रॅपर यांसारख्या विविध कलाक्षेत्रातील मंडळींना संधी मिळाली. यांत भर घालत आता ‘बिग बॉस’च्या घरात वाईल्ड कार्ड स्पर्धकाची एण्ट्री झालेली पाहायला मिळत आहे. यंदाच्या या नव्या पर्वातील पहिला वाईल्ड कार्ड स्पर्धक ‘बिग बॉस’च्या घरात आला आहे. अखेर संग्राम चौगुले हा रांगडा गडी या खेळात वाइल्ड कार्ड सदस्य म्हणून आला आहे. (Sangram Chougule Wild Card Entry) संग्राम चौगुले हा मूळचा कोल्हापूरचा आहे. लोकप्रिय बॉडीबिल्डर म्हणून त्याने स्वत:ची ओळख निर्माण केली आहे. संग्राम फिटनेस फ्रिक असून २०१२ मध्ये त्याने ८५ किलो वजनी गटात मिस्टर युनिव्हर्सचं विजेतेपद पटकावलं होतं. तर, २०१४ मध्ये संग्रामने मिस्टर वर्ल्ड स्पर्धा जिंकली होती. त्याने एकूण सहा वेळा मिस्टर इंडिया व पाच वेळा मिस्टर महाराष्ट्र हा किताब पटकावला. संग्रामच्या शैक्षणिक पार्श्वभूमीबद्दल सांगायचं झालं तर, तो इलेक्ट्रिकल इंजिनीअर आहे. मनगटात ताकद, बोलण्यात वजन, वागण्यात कोल्हापुरी बाणा असलेल्या बलवान आणि आपल्या ...

ज्येष्ठा गौरी आवाहन कधी ? मुहूर्त आणि पूजा पद्दत जाणून घ्या [Gauri Avahan 2024]

Image
  महाराष्ट्र तसेच इतर राज्यांमध्ये गणेश चतुर्थी उत्सवादरम्यान अनेक घरांमध्ये ज्येष्ठा गौरी पूजन केले जाते. 2024 मध्ये 10 सप्टेंबर रोजी गौरी आवाहन तर 11 सप्टेंबर रोजी गौरी पूजन आणि 12 सप्टेंबर 2024 रोजी गौरी विसर्जन आहे. देवी गौरी या गणेशाची आई पार्वतीचे दुसरे नाव आहे. देवी गौरीचे घरांमध्ये आगमन आरोग्य, संपत्ती, सुख-समृद्धी घेऊन येते असे म्हटले जाते. आपआपल्या परंपरेनुसार ज्येष्ठा आणि कनिष्ठा अशा गौरीच्या दोन मूर्ती, चित्र किंवा खडे घरी आणून त्यांची पूजा केली जाते. भाद्रपद शुक्ल अनुराधा नक्षत्रावर गौरीचे आगमन केलं जातं. पहिल्या दिवशी आवाहन केलं जातं. दुसऱ्या दिवशी ज्येष्ठा नक्षत्रावर मुख्य गौरी पूजन आणि महाप्रसाद तसेच काही लोकं यादिवशी सत्यनारायण पूजा देखील करतात आणि तिसऱ्या दिवशी मूळ नक्षत्रावर गौरींचे विसर्जन केलं जातं. ज्येष्ठा गौरी पूजा शुभ मुहूर्त 2024 10 सप्टेंबर 2024 : ज्येष्ठागौरी आवाहन रात्री 08.04 पर्यंत कधीही करता येईल. 11 सप्टेंबर 2024 : ज्येष्ठागौरी पूजन 12 सप्टेंबर 2024 : ज्येष्ठागौरी विसर्जन रात्री 09.51 पर्यंत   काही प्रदेशात गौरी पूजनाला महालक्ष्मी पूजनाची उपास...

कधी आहे गणेश चतुर्थी? गणेशोत्सवादरम्यान जुळून आले मोठे योग, जाणून घ्या माहिती [Ganesh Chaturthi 2024]

Image
दरवर्षी भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या चतुर्थी तिथीला गणेश चतुर्थी साजरी केली जाते. या दिवसापासून पुढील दहा दिवस जल्लोषात गणेशोत्सव साजरा केला जातो.  दरवर्षी भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या चतुर्थी तिथीला गणेश चतुर्थीचा (Ganesh Chaturthi) सण साजरा केला जातो. गणेश चतुर्थी ते अनंत चतुर्दशीपर्यंतचे दिवस धुमधडाक्यात साजरे केले जातात. भाविक दहा दिवस लाडक्या गणपती बाप्पाची मनोभावे सेवा करतात. थाटामाटात सोहळा साजरा केला जातो. भाविक घरोघरी, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांमध्ये बाप्पाच्या मूर्तीची स्थापना करून त्याची विधीवत पूजा करतात. देशभरात मोठ्या जल्लोषात हा सोहळा साजरा केला जातो. दरम्यान यंदाच्या गणेशोत्सवादरम्यान मोठमोठ योग जुळून आले आहेत, याबाबत जाणून घेऊया सविस्तर माहिती...   गणेश चतुर्थी 2024 कधी आहे? l Ganesh Chaturthi 2024  भाद्रपद शुक्ल पक्षाची चतुर्थी तिथी 6 सप्टेंबरला 3:01 वाजता सुरू होणार आहे तर दुसऱ्या दिवशी म्हणजेच 7 सप्टेंबरला संध्याकाळी 5:37 वाजता तिथी समाप्त होईल. सूर्यादयानुसार 7 सप्टेंबर रोजी गणेश चतुर्थीचा सण साजरा केला जाईल. या दिवशी भाविक सार्वजनि...